सुहास मांजरेकर वेंगुर्ले येथून बेपत्ता : वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

0
54

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले गाडीअड्डा येथील रहिवाशी सुहास पांडुरंग मांजरेकर वय वर्ष ५२ हा तरुण गेले चार दिवसापासून वेंगुर्ले येथे राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे.

त्यांच्या घरातून वेंगुर्ला पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार देण्यात आलेली आहे. सदर तरुण वेंगुर्ला येथे एका कापड दुकानात ३० वर्षापासून काम करत होता. कामाला जातो असं सांगून गेला तो घरी परतलाच नाही. तरी सदर तरुण कुणाच्या दृष्टीत पडल्यास संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.