यंगस्टार मित्रमंडळाच्या महिला कबड्डी स्पर्धेचे उदघाटन 

0
18

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा चळवळीत यंगस्टार मित्रमंडळाचे योगदान मोठे आहे. हे मंडळ दरवर्षी कणकवलीत कबड्डी स्पर्धा आयोजित करीत असते. मंडळाचा हा क्रीडा विषयक उपक्रम कौतुकास्पद आहे. यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कबड्डीपटू खेळताना दिसतील, अशा विश्वास माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाने प. पू. भालचंद्र महाराज संस्थान नजीक असलेल्या नगरपंचायतीच्या कीडासंकुल परिसरात गुरुवारी जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. याचे उद्घाटन मेघा गांगण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, माजी नगरसेविका वैशाली आरोलकर, संजना सदडेकर, साक्षी वाळके, प्रियाली कोदे, भैय्या आळवे, संजय मालंडकर, रवी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यंगस्टार मित्रमंडळ सामाजिक उपक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करीत असते. हे मंडळाचे हे उपक्रम कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला कबड्डीपटूंसाठी मंडळाकडून जिल्हास्तरीत कबड्डी स्पर्धा आयोजित केली जात आहे. मंडळाचा हा क्रीडा विषयक उपक्रम स्तुत्य आहे, असे गांगण यांनी सांगून स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला कबड्डीपटूंना शुभेच्छा दिल्या. सुप्रिया नलावडे यांनी यंगस्टार मंडळाच्या महिला कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

 

आरंभी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून मेघा गांगण यांनी या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यानंतर मान्यवरांनी महिला कबड्डीपटूंना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. यावेळी कबड्डीप्रेमी उपस्थित होते.