रात्री अचानक गॅसच्या वासाने नागरिक घाबरले

0

रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप, जे.के.फाईल कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात गॅसचा वास येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा वास नेमका कुठून येतो आहे? वायुगळती मुळे हा वास येत नाही ना.? अशा शंका निर्माण होऊ लागल्या. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, शैलेश बेर्डे, अमित आठवले, पुंडलिक पावसकर आधी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील कंपन्यांचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.

 

शहर पोलीस स्टेशनचे निखिल माने, ग्रामीण पोलीस स्टेशन येथील अधिकारी, तहसीलदार श्री. म्हात्रे साहेब आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह उपस्थित झाले. ऑकटेल कंपनीमध्ये वायू गळतीचा संशय असल्याने तेथील अधिकारी संजय साळवी यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here