खेड तालुक्यातील दस्तुरी फाटा व भरणेनाका येथे शुभअंकांवर मटका जुगार खेळवित असणाऱ्या दोघांवर येथील पोलिसांनी कारवाई करून एकूण १६५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० व ६.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पांडुरंग तांबे (४०) हा दस्तुरी फाटा येथे खेड दापोली रस्त्याच्या उजव्या बाजूला पिंपळाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत दैनिक पेपरमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शुभअंकांवर पैसे लावून मटका जुगाराचा खेळ खेळवत असताना मिळून आला. त्याच्याकडून १ हजार रूपये रोख व जुगाराचे साहित्य असा १०२०/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला तसेच भरणेनाका येथील मोरे चिकन सेंटर समोर रविंद्र बंडू मोहिते (३६) हा कल्याण पेपरमध्ये प्रसिध्द होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावून मटका जुगाराचा खेळ खेळवित असताना मिळून आला. त्याच्याकडून ६३०/- रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले.