वेंगुर्ले पंचायत समिती मध्ये घेतलेल्या महिला मेळाव्याला प्रतिसाद

0
64

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत आयोजन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पंचायत समिती वेंगुर्ला येथे महिला मेळावा घेण्यात आला. त्याला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती वेंगुर्ला चे गटविकास अधिकारी श्री दिनेश पाटकर, गटशिक्षणाधिकारी श्री संतोष गोसावी, तालुका अभियान व्यवस्थापक श्री अमोल कावले, पशुधन अधिकारी डॉ म्हापणकर, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शर्मिष्ठा सामंत, सहाय्यक लेखा अधिकारी श्री चाटे उपस्थित होते. सर्व विभागांनी आपल्या विभागांकडील असणाऱ्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमांमध्ये सौ प्रीती गावडे सीआरपी व सौ उर्वी गावडे प्रभाग संघ अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.