दोडामार्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये संपन्न झाली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सेवा दलाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रवीण नाईक दोडामार्ग तर संघटकपदी श्री.नितीन वाळके मालवण यांची एकमताने निवड करण्यात आली.
राज्यकार्यकारणी सदस्य म्हणून संजय वेतुरेकर, समीर परब, कु वैदेही परमेकर,कु सोनल गवस,उपाध्यक्षपदी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक,प्रा.राजेंद्र मुंबरकर, सचिव पदी डॉ. सुभाष अमर सावंत, सहसचिव रश्मी वायंगणकर, सहसंघटक विद्या दिलीप राणे, खजिनदार प्रा.डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे,
जिल्हा सदस्य म्हणून अनंत लोखंडे,
रिया रितेश जांभवडेकर,
शरद बाजीराव देसाई,के.जी. कांबळे,
तर सल्लागार म्हणून
कमलताई परुळेकर,दीपक भोगटे,
उमेश गाळवणकर,चारुशीला देऊलकर,सुहास ठाकूर देसाई,सूर्यकांत भाई परमेकर, श्री. मूर्ती कासार सावंतवाडी
यांची निवड करण्यात आली.
ॲड. प्रवीण नाईक यांच्या निवडिचे सर्वांनी अभिनंदन केले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यणी आपली मनोगते व्यक्त केली,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित, पिढीत, शोषीत यांच्यासाठी व जिल्ह्यातील पर्यावरण, सामाजिक सलोखा, सिंधुदुर्गचा प्राण असलेल्या जंगल व निसर्ग पर्यटनातून आर्थिक सुबत्ता, सिंधुदुर्गचा निसर्ग वाचवणे या मुद्द्यावर जनजागृती करणे व एक सुदृढ, शांत, आनंददायी समाज निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.