फोंडाघाट– श्री देव पाचोबा मित्रमंडळाच्या वतीने रामनवमीच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रिल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेना उपनेते मा. संजय आग्रे, फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संजना आग्रे, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. राजू पटेल, फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन श्री. राजन नानचे, उद्योजक श्री. शेखर लिंग्रस, श्री. सुरेश सामंत, श्री. विश्वनाथ जाधव, श्री. सुंदर पारकर, गुरुजी श्री. सुभाष सावंत, श्री. पवन भोगले, पोफळे सर, रासम सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये श्री देव पाचोबा मित्रमंडळाचे कार्यकर्ते – अण्णा पारकर, राजेश कोथांबिरे, संजय नेरुळकर, निलेश भोगले, सुस्मित घाग,विजय आग्रे, प्रणय सावंत, श्रीकांत पारकर, हर्षद पाटकर, हर्षद खरात, हर्षद सावंत, विजय लाड तसेच गौरेश म्हसकर यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष जोईल सर यांनी प्रभावीपणे पार पाडले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: सिद्धेश चव्हाण – रोख ₹15,555, चषक, प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू
द्वितीय क्रमांक: विराज ढवण – ₹7,555, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू
तृतीय क्रमांक: सुजित सामंत – ₹3,555, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू
याशिवाय 5 स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली, तसेच सहभागी इतर 26 स्पर्धकांनाही प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.
फोंडाघाट परिसरातील शेकडो ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, आणि स्पर्धक-प्रशंसकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.