आमदार निलेश राणे यांनी मंजूर केलेल्या विकासनिधीचे आकडेच बोलतात
सर्वच मंत्र्यांकडून आमदार निलेश राणे यांच्या मागणीची घेतली जाते तात्काळ दखल
मंत्री आशिष शेलार मालवणात आले अन आ. निलेश राणे यांनी मागणी करताच दहा कोटींची घोषणा झाली
अमित खोत | मालवण : मालवण कुडाळ मतदारसंघ नैसर्गिक विपुलतेने भरलेला आहे. गड किल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक ठेवा ही अमूल्य संपत्ती आहे. हे सर्व जपत असताना या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करून सातत्याने कार्यरत असणारे आमदार निलेश राणे मतदारसंघात शेकडो कोटी विकासनिधी आणण्यात यशस्वी ठरले आहेत. आमदार निलेश राणे यांचा पहिल्या चार महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ पाहता मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकासाच्या सुवर्णकाळाची ही पायाभरणीच ठरली आहे. म्हणूनच ‘आमदार असावा तर असा’ हे जनतेचे बोल खऱ्या अर्थाने सार्थ ठरत आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे खासदार म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व करणारे निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या चार महिन्यातच यशस्वी मोहर उमटवण्यात यशस्वी ठरले. त्यांनी मंजूर करून आणलेल्या शेकडो कोटी निधीतील कामाचे आकडेच सर्वकाही बोलत आहेत.
आमदार निलेश राणे यांचा प्रत्येक विषयात असलेला सखोल अभ्यास त्यांच्या विधिमंडळातील अनेक भाषणातून सर्वांनी अनुभवाला. विषयाची मांडणी, त्याची गंभीरता, निधीची आवश्यकता हे मुद्दे मांडण्याची पद्धत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे प्रतिबिंब ठरावी अशी दिसून येते.
मंत्री स्तरावर आमदार निलेश राणे यांची मागणी प्राधान्यक्रमाने मंजूर होताना दिसत आहे. सोबतच आमदार निलेश राणे यांच्या मागण्यांसाठी प्रशासनही गतिमान होते. बंधारे बांधणीसाठी कोट्यावधी निधी, रस्ते विकासासाठी कोट्यावधी, शासकीय कार्यालये, शाळा इमारतींच्या नूतनीकरणसाठी कोट्यावधी, वीज सुविधासाठी, पाणी योजना यासाठी कोट्यवधी यासोबत देवबाग गावाच्या सागरी सुरक्षा व सुविधा यासाठी एकाचवेळी 158 कोटी निधी मंजूरिची अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलीली घोषणा आमदार निलेश राणे यांचे कार्यकर्तृत्व व मंत्रालय स्तरावर असलेले वजन स्पष्ट करणारी ठरते.
मंजूर विकासकामे होत आहेत. जनतेच्या अपेक्षाही वाढत आहेत. विकसाच्या मोठया आश्या गावागावातून व्यक्त होत आहेत. दहा वर्षात विकासापासून कोसो दूर असलेली गावे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासाच्या नव्या दिशा शोधत आहेत. निश्चितच निलेश राणे यांचा विकासाचा हा रथ गतिमान रित्या भरारी घेईल. हा विश्वास प्रत्येकजण व्यक्त करतं आहे.
एका कार्यक्रमात दहा कोटी निधी मंजूर करून घेतले
किल्ले सिंधुदुर्ग वर्धापनदिन सोहळ्या निमित्ताने मालवण येथे आलेल्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे आमदार निलेश राणे यांनी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह नूतनीकरणसाठी निधीची मागणी केली. या मागणीची दखल मंत्री आशिष शेलार यांनी घेत अत्याधुनिक सुविधासोबत सिनेमागृहही याठिकाणी होईल.. एक आधुनिक दर्जाचे नाट्यगृह होत असताना दहा कोटी निधी लागला तरी तो देऊ ही मंत्री आशिष शेलार यांची घोषणा आमदार निलेश राणे यांचे कर्तृत्व आधीरेखेत करणारी ठरली. एका कार्यक्रमातून आमदार निलेश राणे यांनी कोट्यावधी निधी मालवणच्या विकासासाठी मंजूर करून घेतला. यापुढेही असाच निधी मंजूर होत राहील.