रत्नागिरी | श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, मारुती मंदिर सर्कल , रत्नागिरी यांच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या उपक्रमात हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना अणि त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रकारची फळे देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. ट्रस्टच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी भावनेचा एक सकारात्मक संदेश देण्यात आला.
या वेळी श्री कुंतल खातु, श्री धनेश रायकर, श्री शिरीष बामणे, श्री विनायक गांधी, श्री सार्थक गांधी, श्री साहिल शेटे, श्री साईश गांधी तसेच ट्रस्टचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शांत, सुव्यवस्थित व मनोभावे पार पडले.
श्री हनुमान मंदिर ट्रस्ट विविध सामाजिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रम राबवत असते. यंदाचा जन्मोत्सवही त्या सेवाभावाने साजरा करण्यात आला.