जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत वेतोरे हायस्कूल चा विद्यार्थी साईराज सामंत प्रथम 

0
28

खासदार नारायण राणे यांनी बक्षीस देऊन केले अभिनंदन

वेंगुर्ले :माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे चषक २०२५ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.साईराज विनय सामंत याने दैदिप्यमान यश मिळवित प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल त्याचे खासदार नारायण राणे यांनी बक्षीस देऊन अभिनंदन केले.

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षा खालील गटात कु.साईराज विनय सामंत याने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले.कु. साईराज हा इयत्ता आठवी मध्ये शिकत असून यापूर्वी ही त्याने राज्य स्तरापर्यंत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात मजल मारली आहे.

त्याच्या या उज्वल यशाबद्दल शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे कार्याध्यक्ष श्री. दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष श्री.सुर्याजी नाईक, कार्यवाह श्री.प्रभाकर नाईक सर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री.संजय परब सर, प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे तसेच त्याच्या आई वडिलांचे,

मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.