समन्वय समितीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन.
ओटवणे (प्रतिनिधी )स्वातंत्र्य, समता, बंधुता व ज्ञाय मिळवून देणारे सामाजिक क्रांती घडवून देशाची शान उंचावणारे दलितांचे भाग्य विधाते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रभोधन समन्वय समिती सावंतवाडी व नगर परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 14 एप्रिल रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक जन जागृती प्रबोनात्मक कार्यक्रमानी पार पडत असून आठवडा भर कार्यक्रम सुरु आहेत. रविवारी 6 एप्रिल रोजी भीमगीत समूह गीत गायन स्पर्धा बॅरिस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे पार पडली. त्यानंतर गुरुवारी 10 एप्रिल सकाळी 9 वा. रक्तदान शिबीर पार पडले तर जयंती दिवशी सकाळी 10 वा.ध्वजारोहण त्रिसरण, पंचशील, बुध्द पूजा पाठ, स. 11 वा. सभाध्यक्ष समाज प्रभोधन समन्वय समिती अध्यक्ष मीनाक्षी तेंडोलकर यांच्या उपस्थितीत अभिवादन सभा बक्षीस वितरण. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून अँड.सुधाकर किरा बौद्ध रानी चनम्मा विद्यापीठ बेळगाव यांचे भारतीय संविधानाची 75 वर्षे या विषयावर व्याख्यान होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी नगर परिषद मुख्याधिकारी परीतोष कंकाळ हे उपस्थिती राहणार आहेत तर स्वागता ध्यक्ष टिळाजी जाधव उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1.30 वाजता सहभोजन तर 3 ते 5 यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम तर खास आकर्षण माता रमाई च्या जीवनावर आधारित सादरकर्ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विद्रोही कवयित्री अभिनेत्री आणि लेखिका रमणी बबिता आकाश (पुणे ) या एकपात्री नाटक “होय मी राजगृहातील रमाई बोलते….” सादर करणार आहेत. तर सायं. 5 वाजता भव्य जयभीम रॅली शहरातून काढली जाणार आहे. तरी या कार्यक्रमाला समाज बांधव आंबेडकर अनुयायांसह सर्व लोकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रभोधन समन्वय समिती, सावंतवाडी कडून करण्यात आले आहे.