कोकण मार्गावर ५ रेल्वेगाड्या धावल्या ‘लेट’

0
32
खेड(प्रतिनिधी) सलग सुट्ट्धांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्लच धावत आहेत. जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू आहे. या चढाओढीत रेल्वेगाड्यांच्या विलंबाची भर पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी ५ रेल्वेगाड्यां  ‘लेट धावल्या  उधना-मंगळूर स्पेशल ४ तास विलंबाने घावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अन्य ४ गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला.
शुक्रवारी महावीर जयंतीच्या सुट्टीसह विकेंड मुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांसह गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी उसळत आहे.
गाड्यांना होणाऱ्या गर्दीतून एन्ट्री मिळवताना प्रवाशांची दमछाक होत आहे. दिमतीला उन्हाळी स्पेशल धावत असल्याने गर्दीची तीव्रता काही अंशी कमी होण्यास तितकीच मदत होत आहे. आतापर्यंत कोकण मार्गावर ५ उन्हाळी स्पेशलच्या  गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत