श्री हनुमान जन्मोत्सवाचे निमीत्ताने धुत्रोली हनुमानवाडी येथे विविध कार्यक्रम. 

0
4

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, शतकोत्तर सुवर्ण वर्ष ( 150 वर्ष ) महोत्सव 

मंडणगड l प्रतिनिधी : श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा शतकोत्तर सुर्वण महोत्सव वर्षांचे औचीत्यसाधून हनुमान वाडी धुत्रोली येथे 11 ते 13 एप्रिल 2025 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (11) रोजी सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, किर्तन (12) रोजी हनुमान जन्मसोहळा, सत्कार सोहळा, पालखी मिरवणुक (13) रोजी क्रीकेट स्पर्धा व महायात्रेचा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या निमीत्ताने (13) रोजी आयोजीत जाहीर कार्यक्रम व सत्कार सोहळ्यास खासदार सुनील तटकरे, नामदार योगेश कदम, अमोल कीर्तीकर, माजी आमदार संजय कदम यांची विशेष उपस्थित लाभणार आहे. या निमीत्ताने विकास शेट्ये जयश्री गुजर, संदीप जाधव, बाबूराव गुजर, गोपीनाथ सालेकर, सुप्रिय तांबे, प्रविण सुगदरे, दिलीप मळेकर, यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. मनोरंजनसाठी जननी देवी नृत्यकलापथक जुई महाड, शिवचैतन्य तमाशा कलापथक मुक्काम मुर ता माणगाव यांच्या शक्ती तुरा तमाशा जंगी सामना आयोजीत करण्यात आला आहे. तालुकावासीयांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जय हनुमान सेवा मंडळ हुनमानवाडी धुत्रोली, मुंबई मंडळ धुत्रोली, जय हनुमान सेवा मंडळ मुंबई व सुसंगती महिला मंडळ, धुत्रोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.